अमरावती : पत्रकारांच्या हक्क आणि हितासाठी काम करणार्या पॉवर ऑफ मीडिया फाऊंडेशनच्या जंबो कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष किशोर अबितकर, उपाध्यक्ष एम.डी. चव्हाण, सचिव अनिल कदम व राज्य संघटक संदीप बाजड यांच्या आदेशानुसार सोमवारी अंबादेवी येथील जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत विभागीय सदस्य अमोल नानोटकर, कुशल लोटे, जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण हरमकर, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख फणिंद्र वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी दैनिक मंगल प्रहरचे मुख्य संपादक व पॉवर ऑफ मिडियाचे नवनिर्वाचित अमरावतीचे शहर अध्यक्ष सुधीर गणवीर यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली. ज्यामध्ये उपाध्यक्षपदी राजेंद्र ठाकरे, प्रवीण शेगोकर, वैभव गव्हाणे, सचिवपदी सतीश वानखडे, कोषाध्यक्षपदी रवींद्र इंगळे, प्रसिद्धी प्रमुखपदी पवन श्रीवास्तव, संपर्क व कार्यालय प्रमुख म्हणून गजानन जिरापुरे आणि महिला शहर प्रमुख म्हणून मंजुताई ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर मुख्य सल्लागार समितीवर जेष्ट पत्रकार नरेंद्र देशपांडे, अशोकभाई जोशी, धनंजय कानबाले, अश्विन गुजर, सचिन शेगोकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी सदस्य पदी विजय सौदागर, अरविंद लुकंड, विक्ली बांभूळकर, मिनाक्षी कोल्हे, योगेश श्रीवास्तव, विलास फरकाडे, लता अंबुलकर, राहुल टेकाडे, प्रदीप इंगोले, ज्योती बोराडे, लतीका श्रीवास्तव, वंदना तेलखंडे, रुची बनगैया यांच्यासह आदी पदाधिकारी व सदस्यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्य सदस्या अनिता काळे (बाजड), विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे, अकोला जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब गणोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पॉवर ऑफ मीडियाची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर
Contents hide