• Sat. Jun 3rd, 2023

पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार इरफान खानचा शेवटचा चित्रपट

ByBlog

Dec 29, 2020

मुंबई: दिवंगत अभिनेता इरफान खानने आपल्या दमदार अभिनय कौशल्याने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. इरफान खानचा शेवटचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विेषक तरण आदर्शने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे.
तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिले, इरफानचा शेवटचा चित्रपट. सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स २0२१ मध्ये प्रदर्शित होणार. द सॉंग ऑफ स्कॉर्पियन्स या चित्रपटात इरफान खानने एका व्यापाराची भूमिका साकारली आहे. इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. स्वित्झलर्ंडमध्ये ७0व्या लोर्कानो फिल्म फेस्टिव्हल २0१७ मध्ये हा चित्रपट प्रिमीयर झाला होता. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. इरफान खानने २९ एप्रिल रोजी मुंबईच्या कोकिलाबेन धिरूभाई अंबानी या रुग्णालयात शेवटचा श्‍वास घेतला. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली होती. फक्त भारतच नाही तर जगभरात इरफान खानचे मोठय़ा प्रमाणात चाहते आहेत. इरफानने फक्त हिंदी नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं. इरफानने छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. मेहनतीच्या जोरावरच त्याने यश मिळवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *