• Wed. Jun 7th, 2023

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून तिवसा येथे 10 कोटींचा निधी विविध विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण

ByBlog

Dec 12, 2020

अमरावती : विकासकामांसाठी जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी गतिमान विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटीबध्द असल्याचे सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून तिवसा नगर पंचायत क्षेत्रात 10 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यातून तिवसा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तसेच शहिद सचिन श्रीखंडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण तसेच इतर विविध विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मुकुंद देशमुख, अतुल देशमुख, दिलीपराव काळबांडे, संजयराव देशमुख, संध्याताई मुंदाने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, तिवसा शहरात छत्रपती शिवराय यांचा पुतळा, शिव छत्रपती चौक, शहिद सचिन श्रीखंडकर यांचे स्मारक ही प्रेरणास्थळे असून त्यापासून तरुणाईसह सर्व नागरिकांना नवचेतना मिळेल. तरुणाईसाठी, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रासारखी ज्ञानकेंद्रेही उभारण्यात आली आहेत. विविध धार्मिक स्थळांच्या विकासासह रस्ते, पुल, इतर आवश्यक बांधकाम आदी विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे. यापुढेही आवश्यक कामांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कोरोना संकट काळातही विकासाची प्रक्रिया थांबलेली नाही. ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तिवसा शहरातील धार्मिक स्थळे, सामाजिक, शैक्षणिक आदी कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, संत शिरोमणी संताजी महाराज सभागृह, नवीन तहसील ते क्रीडा संकुलपर्यंत रस्ता बांधकाम, रतनगीर महाराज मंदीर परिसर सौंदर्यीकरण, महानुभाव मंदीर रस्ता बांधकाम, गजानन महाराज मंदीर, साईबाबा मंदीर सभागृहाचे सौंदर्यीकरण, गौतम मुंदे गुरुजी ते माध्यमिक विद्यालय रस्ता बांधकाम, अंकुश देशमुख ते खाकसे यांच्या घरापर्यंतचा रस्ता बांधकाम, ओपन जीम व उद्यानाचे सौंदर्यीकरण, गजानन काळे यांच्या घरासमोरील उद्यानाचे सौंदर्यीकरण, आनंदवाडी येथील बौध्दविहाराचे सौंदर्यीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे बांधकाम, घनकचरा डेपोची संरक्षण भिंत व विकासकाम, आनंदवाडी येथील पुलाचे बांधकाम व इतर विकासकाम आदी विविध कामांसाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी निधी मिळवून दिला.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *