• Fri. Jun 9th, 2023

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्हा दौरा

ByBlog

Dec 24, 2020

अमरावती : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या शुक्रवार दि. 25 डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार, दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता निवासस्थानी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबतची बैठक व चर्चा. सकाळी 10.30 वाजता अमरावती निवासस्थान येथून दर्यापूरकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दर्यापूर येथे आगमन व शुभम मंगल कार्यालय येथे आयोजित भाऊबीज कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता धनेगाव ता. अंजनगाव सुर्जीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता धनेगाव येथे आगमन व आत्महत्याग्रस्त शेतकरी अशोकराव भुयार यांच्या घरी सांत्वनपर भेट. दुपारी 3 वाजता धनेगाव येथून वलगावकडे प्रयाण. दुपारी 3.45 ते 4.45 वाजेपर्यंत वलगावला विजय कुरळकर यांच्याकडे लग्नानिमित्त भेट तसेच मनोज शिरभाते, योगेश हादवे यांच्या घरी सांत्वनपर भेट. सायंकाळी 5 वाजता वलगाव येथून तिवसाकडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वाजता तिवसा येथे आगमन व अभ्यांगतांसोबत भेटी व ऋुषीकेश खाकसे यांच्याकडे विवाह समारंभास उपस्थिती. रात्री 9 वाजता अमरावती निवासस्थानकडे प्रयाण, आगमन व राखीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *