आजकाल बैठं काम, बसण्याची अयोग्य पध्दत, चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव या तसंच अन्य काही कारणांनी पाठदुखीच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. पाठीचं दुखणं ही वरकरणी सामान्य बाब वाटत असली तरी या वेदनांमुळे दैनंदिन कामांमध्ये अनेक अडथळे येतात. पण रोजच्या चुकीच्या सवयी हेच पाठीच्या दुखण्यामागचे कारण असू शकतं. त्यामुळे पाठीच्या दुखण्याच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ही पाठदुखी टाळण्यासाठी काही उपाय करता येण्यासारखे आहेत.
पाठ आणि पाठीचे स्नायू बळकट व्हावेत, यासाठी नियमित व्यायाम करावा. पाठीचं दुखणं तीव्र स्वरूपाचं असेल तर पाठीवर ताण येणारे व्यायाम करू नका. जड वस्तू उचलणे टाळा. तशी वेळ आलीच पाठीला त्रास होणार नाही,अशा पद्धतीने ती उचला. वस्तू उचलताना पूर्ण वाकू नका. पाठ सरळ ठेऊन गुडघ्यात वाका. वजन नियंत्रणात ठेवा. स्थूलतेमुळे पाठीच्या खालच्या भागावर ताण येत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. उभं राहताना खांदे सरळ रेषेत, खांदे तसेच पाय एकाच रेषेत, दंड शरीराच्या जवळ तर दंडाच्या खालचा भाग सरळ रेषेत हवा.
पाठदुखी ठेवा दूर
Contents hide