पंतप्रधान 25 डिसेंबरला पीएम किसान अंतर्गत पुढचा हप्ता जारी करणार

Mumbai(PIB) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2020 ला दुपारी 12 वाजता दूर दृष्य प्रणाली द्वारे, प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम–किसान) अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता जारी करणार आहेत. पंतप्रधानांनी बटन दाबल्यानंतर 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी हस्तांतरित होईल.
या कार्यक्रमादरम्यान सहा राज्यातल्या शेतकऱ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. पीएम-किसान आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सरकारच्या विविध उपक्रमाबाबत शेतकरी आपले अनुभव कथन करतील.केंद्रीय कृषी मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पीएम किसानयोजने बाबत
पीएम किसान योजने अंतर्गत, पात्र लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपयांचा निधी दिला जातो. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यात दर चार महिन्यांनी ही रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!