अमरावती : अमरावती कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
निवृत्तीवेतन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि दि. 8 डिसेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखल सादर करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृपया याची संबंधितांनी नोंद घ्यावी व सहकार्य करण्याचे आवाहन कोषागार विभागाव्दारे करण्यात आले आहे.
सर्व बँक शाखा व्यवस्थापकांनी अमरावती कोषागारामधून निवृत्तीवेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या हयातीची यादी दि. 28 फेब्रुवारी ते 5 मार्च 2021 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती येथे सादर करावी, असे आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी कंवल चौहान यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ ; 28 फेब्रुवारी अंतीम मुदत
Contents hide