• Sat. Jun 3rd, 2023

नाचणारे हवे….

ByBlog

Dec 14, 2020
    स्वतः माणसाला । माणूस मारतो ।
    अधर्म करतो । दैत्यासम ।।
    ईतर प्राण्यात । नाही अशी प्रथा ।
    ऐकिवात कथा । आहे कुठे? ।।
    नाचणारे हवे । नाही बोलणारे ।
    व्यथा मांडणारे । दोषी झाले ।।
    निर्लज्ज माणसे । आवडती फार ।
    खऱ्यास नकार । मिळे सदा ।।
    गरीबांची व्यथा । मांडणारे कमी ।
    आहेच संयमी । किती इथे? ।।
    सगळ्यांना प्रिय । धन जिवाहून ।
    हत्यार म्हणून । त्यांच्या हाती ।।
    पैशासाठी कोणी । गुलाम बनून ।
    तळवे चाटून । राहतात ।।
    माणुसकी कुठे । राहिली शिल्लक ।
    माणूस मालक । माणसाचा ।।
    कुठले संस्कार । कुठली पद्धत? ।
    बाप होतो नत । मुलांपुढे ।।
    अस्ताला चालली । माणुसकी आता ।
    हरवला दाता । गरीबांचा ।।
    अजुस वाटते । कठीण शोधणे ।
    माणूस पाहणे । माणसात ।।
    अजय रमेश चव्हाण,तरनोळी
    ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७
0 thoughts on “नाचणारे हवे….”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *