• Sat. Jun 3rd, 2023

नशा….

ByBlog

Dec 28, 2020
  नशा भुलविते । नशा संपविते ।
  नशा दुखविते । प्रत्येकास ।।
  माणसाचा दैत्य । नशा बनविते ।
  नित्य जगविते । कुत्र्यासम ।।
  लोळणे घेतात । पिणारे रस्त्याने ।
  असती रक्ताने । माखलेले ।।
  कोणाच्या डोक्याला । कोणाच्या हाताला ।
  कोणाच्या पायाला । लागलेले ।।
  भक्त जुगाराचा । नशेच्या अधीन ।
  झाला आहे दीन । याचमुळे ।।
  काय समजावे । अशा मानवास ।
  भोगतात त्रास । बारोमाही ।।
  बेधुंद होऊन । भुलू नका धर्म ।
  चुकवून कर्म । जगू नका ।।
  अजु म्हणे जगा । व्यसन त्यागून ।
  धर्म जागवून । माणसाचा ।।
  शब्दसखा-
  अजय रमेश चव्हाण
  तरनोळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *