मुंबई : देशावर नव्या कोरोनाचे सावट आहे. ब्रिटनहून आलेल्या २0 जणांना नव्या कोरोनाची लागण झाली आहे. नव्या कोरोनाग्रस्तांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, भारत-ब्रिटन विमानसेवा बंद करण्यात आली आहे. खबरदारी घेण्यात येतआहे. मात्र, राज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात यूकेच्या दुसर्या स्ट्रेंनचा अद्याप एकही रुग्ण नाही. ४३ नमुन्यात एकही दुसर्या स्ट्रेंनचा पॉसिटिव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळे घाबरायचे कारण नसल्याचे टोपे यांनी सांगितले, महाराष्ट्र देशात पाहिले राज्य आहे ज्यांनी वङ मधील फ्लाईट थांबवल्या असेही टोपे यांनी सांगितले. विदेशातून येणार्या सगळ्या प्रवाश्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारेनटाईन करत आहोत. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात असल्याचं ते म्हणाले.
यूकेवरून महाराष्ट्रात आलेल्या ४३ प्रवाशांचे नमुने तपासले आहेत, त्यात नवा स्ट्रेन आढळला नाही. तसेच यूकेवरून आलेले प्रत्येक व्यक्तीची योग्य तपासणी केली जात आहे. प्रवासी निगेटिव्ह असला तरी आम्ही त्याला होम क्वारंटाईन करतो. राज्य सरकार यूके स्ट्रेनबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करत आहे, पण काही प्रवासी गायब असतील तर राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल, असे आश्वासन त्यांनी दिले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन ३१ जानेवारी २0२१ पयर्ंत लागू राहील. तसे राज्य शासनाचे आदेश जारी केले आहेत, असे ते म्हणाले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अवघ्या १३ मिनिटांत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचत आहे. एका आंतरराष्ट्रीय खासगी कंपनीच्या मदतीने ही सुविधा सुरू झाली आहे. चाचणीसाठी प्रवाशांना ४ हजार ५00 रुपये मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानाने येणार्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीची सुविधाही आहे.
नव्या कोरोनाचा राज्यात शिरकाव नाही
Contents hide