नववर्षाच्या स्वागतासाठी..!

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण गोव्याच्या सफरीला प्राधान्य देतात. त्यामुळे या काळात गोवा पर्यटकांच्या गर्दीने फुललेलं असतं. अर्थात, यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी पर्यटकांना कितपत परवानगी दिली जाते, हा विचारात घेण्याजोगा भाग आहे. परंतुकोराना संदर्भातील नियमांचं पालन करून नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटता येण्यासारखा आहे. गोवा म्हटलं की स्वच्छ समुद्रकिनारे, मंदिरं, चर्च समोर येतात. सुटीत गोव्याला जाणार्‍यांनाही इथे वेगवेगळे अनुभव घेता येतात. गोव्यात बरंच काही करण्यासारखं आहे. गोव्याला जायची योजना असेल तर काय करता येईल याविषयी..
गोव्यात स्थानिकांसारखं रहा. इथल्या मच्छीमारांप्रमाणे तुम्ही मासे पकडायला जाऊ शकता. इथे बर्‍याच बोट टूर्स असतात. या टूरमध्ये तुम्ही मासे पकडण्याचा अनुभव घेऊ शकता.
कॅटेमॅरान सेलिंगचा आनंदही लुटू शकता. पालोलेम बीचवरून सुटणारी कॅटेमॅरान हौशी सेलर्ससाठी आहे. यातले तज्ज्ञ असाल तर तुम्ही अधिक काळ सेलिंग करू शकता.
चांदोर गावाला भेट देऊ शकता. पोतिरुगिजांच्या वसाहतींच्या काळात इथले लोक राजेशाही थाटात जगत. हा पाहता येईल. कोटगाओ अभयारण्यात जाऊ शकता. इथे वन्यजीवन अनुभवता येईल. एखादी रम्य सकाळ निसर्गाच्या सानिध्यात घालवता येईल.
ख्रिस्ती, पोतरुगिज कलाकृतींची संग्रहायलं इथे आहेत. अत्यंत सुंदर अशा कलाकृती नक्की आकर्षित करतील.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!