हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच या दिवसात ओव्हरनाईट फेस मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. असे फेसमास्क ऑईल फ्री असल्यानं कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी योग्य ठरतात. यात त्वचेला पोषण देणारी अनेक तत्त्व असतात.
कसे वापरायचे फेस मास्क? मास्क वापरण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हलका मसाज करा. झोपण्याआधी अर्धा तास मास्क चेहर्याला लावा. सकाळी उठल्यावर धुवून टाका.
कसा निवडायचा फेस मास्क?
बाजारात विविध प्रकारचे ओव्हरनाईट फेस मास्क उपलब्ध आहेत. पण हे निवडताना आधी त्वचेचा प्रकार जाणून घ्या. मास्कमध्ये कोणते घटक आहेत हे तपासा. संभ्रम टाळण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुमची त्वचा निस्तेज, कोरडी असेल तर त्वचेला ओलावा देणारे अ आणि क जीवनसत्व असणारे फेस मास्क निवडा. त्वचेवर पुरळ असतील तर थंडावा देणारे मास्क निवडा. त्वचेवर पिंपल, व्हाईट हेड्स, ब्लॅकहेड्स असतील तर असे मास्क वापरणं टाळा. तिशीनंतर तुम्ही अँटी एजींग मास्कही वापरू शकता. शक्यतो नैसर्गिक घटकांपासून बनवण्यात आलेले फेस मास्क निवडा. घातक रसायनं, अल्कोहोल, कृत्रिम रंग यांचा वापर असणारे मास्क अपायकारक ठरू शकतात.
द्या त्वचेला पोषण
Contents hide