• Wed. Sep 27th, 2023

दुर्दैवाने देशाच्या शेतकर्‍याला आंदोलन करावे लागते – शरद पवार

ByBlog

Dec 24, 2020

मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यानच आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ट्विट केले.अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुदैर्वाने देशाच्या शेतकर्‍याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो, असे ट्विट करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली.
या आंदोलनाच्या सर्मथनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!