• Wed. Jun 7th, 2023

डोळ्यात अश्रू

ByBlog

Dec 26, 2020
  तू नको लपवू तुझ्या डोळ्यात अश्रू
  घाव करती काळजाच्या आत अश्रू..
  सारखी बरसात करते आसवांची
  भेटले का हे तुला दानात अश्रू..
  मी कफल्लक काय देऊ आज तुजला
  घ्यायचे तर घे सखे वानात अश्रू..
  प्रश्न आहे सारखा छळतो मनाला
  काल का सांभाळले प्राणात अश्रू..!
  चेह-याचे भाव हे बदलून अपुल्या
  हासणारे पाहिले दुःखात अश्रू..
  लागला इतका लळा या आसवांचा
  ठेवले सांभाळुनी हृदयात अश्रू..
  शरद बाबाराव काळे
  धामणगांव रेल्वे
  ९८९०४०२१३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *