• Sun. May 28th, 2023

डोके दुखते म्हणून …

ByBlog

Dec 23, 2020

डोकेदुखी ही सर्वसाधारणपणे आढळणारी समस्या. ताणतणाव, अपुरी झोप, थकवा अशा कारणांमुळे डोकं दुखू शकते. यासोबतच काही अन्नपदार्थांच्या सेवनामुळेही डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. आपण अनावधानाने आहार-विहाराशी संबंधित बर्‍याच चुका करतो. डोकेदुखीला कारणीभूत ठरणार्‍या काही अन्नपदार्थांविषयी..
कॅफेनच्या अतिसेवनामुळे डोकं दुखू शकतं. तसंच चहा, कॉफीसारख्या पदार्थांचं सेवन अचानक बंद केल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे चहा, कॉफीचं सेवन र्मयादित प्रमाणात करावं.
साखरेला पर्याय म्हणून सुक्रालोज, सॅकरिन, एससल्फेमसारखे घटक वापरले जातात. अशा घटकांच्या अतिसेवनामुळे डोकं दुखू शकतं. त्यामुळे कृत्रिम गोड पदार्थांचं सेवन टाळणं योग्य ठरतं.
अल्कोहोलमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे नियमित मद्यपान करणार्‍यांना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकेदुखी टाळण्यासाठी मद्यपानावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
चॉकलेटचं अतिसेवनही त्रासदायक ठरू शकते. चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण कमी असते. तसेच यात टायरामीन, कॅफेनसारखे घटकही असतात. यामुळे डोके दुखू शकते.
आईस्क्रिमच्या चाहत्यांची कमतरता नाही. पण थंड आईस्क्रिम खाल्ल्यामुळे डोकं दुखू शकतं. आईस्क्रिमच्या थंडाव्यामुळे मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठय़ात अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन डोकं दुखू लागतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *