• Wed. Sep 27th, 2023

डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासंदर्भात सूचना ; शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन विशेष फेरी

ByBlog

Dec 23, 2020

अमरावती, दि. 23 : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (D.El.Ed.) प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्यामुळे सदर जागा ऑनलाईन विशेष फेरीच्या माध्यमातून भरण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी पुढीलप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रध्दतीने प्रवेश होईल. विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा आदीबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी इयत्ता 12 वी खुला संवर्ग 49.50 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. दि. 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी असून 27 डिसेंबर पर्यंत पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करावे. ऑनलाईन प्रवेश अर्जाकरीता खुला संवर्गासाठी 200 रुपये तर इतर संवर्गाकरीता 100 रुपये शुल्क आहे.

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन अप्रू करुन घेतला आहे, पंरतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन पध्दतीने अप्रु केल्याशिवाय उमेदवारांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लागीनमधूनच प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयाची निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ई मेल/ लागीनमधून प्रिंट घ्यावी व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी कोणतही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.