यवतमाळ : यवतमाळच्या वृत्तपत्रसृष्टीत गेल्या ३५ वर्षांपासून सक्रीय असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा दै.विदर्भ मतदारचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप उर्फ पप्पूभाऊ येलमे यांचे आज गुरुवारी, सायंकाळी ६.१० वाजता निधन झाले. ते गेल्या दहा दिवसांपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा मोठा परिवार आहे. प्रदीप येलमे यांनी दै. विदर्भ मतदारकरिता पुसद, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा आदी ठिकाणी काम केले. त्यांच्या पार्थिवावर येथील पांढरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
Contents hide