• Mon. Jun 5th, 2023

जिल्हाधिकाऱ्यांकडून बडनेरा चाईल्डलाईन कार्यालयाला भेट व पाहणी

ByBlog

Dec 15, 2020

अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिशा संस्थेद्वारे संचालित ‘बडनेरा रेल्वे चाईल्ड लाईन’ ला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
चाईल्डलाइन 1098 हा महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व केंद्रीय दूरसंचार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार व चाईल्डलाइन इंडिया फाऊंडेशन, मुंबई यांच्या समन्वयाने ‘काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासाठी’ मोफत, 24 तास (रात्र -दिवस) संपूर्ण भारतात उपलब्ध असलेली तातडीची टोल फ्री फोन सेवा आहे. भारत सरकारच्या ‘एकात्मिक बाल संरक्षण योजने’ अंतर्गत ही सेवा कार्यरत असून बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार संकटात सापडलेल्या बालकांसाठी (वय वर्ष 18 पूर्ण नसलेल्या) काळजी व पुनर्वसनात्मक सेवा पुरवते. जिल्हाधिकारी हे ‘चाईल्डलाइन अ‍ॅडव्हायझरी बोर्डचे’ अध्यक्ष म्हणून या प्रकल्पाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेत असतात. त्याच अनुषंगाने आज भेट आयोजित करण्यात आली होती.
या भेटीदरम्यान त्यांनी चाईल्डलाइन स्टाफ व इतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रेल्वे स्टेशन परिसरात जनजागृतीसाठी चाईल्डलाइनचे पोस्टर लावावेत तसेच या आपत्कालीन सेवा लहान मुलाप्रमाणे गरजू महिला व पुरुषांसाठीही उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. याप्रसंगी बडनेरा रेल्वे स्टेशन व्यवस्थापक मनीष सिन्हा, श्रीमती वंदना चौधरी, बाल कल्याण समिती अध्यक्ष अंजली गुलक्शे, बाल न्याय मंडलाचे सदस्य माधव दंडाळे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अजय डफळे, सिटी चाईल्ड लाईन (HVPM)
समन्वयक फाल्गुन पालकर, आणि दिशा संस्थेचे संचालक प्रवीण खांडपासोळे, ज्योती खांडपासोळे, समन्वयक मनीष आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *