अमरावती : जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत, तसेच नववीत प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य संसिंद्रण सी. के. यांनी कळवली आहे.
मुदतवाढीनुसार सहावीतील प्रवेशासाठी 29 डिसेंबरपर्यंत, तर नववीतील प्रवेशासाठी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. प्रवेश परीक्षा प्रक्रियेत सहभागासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार www.navodaya.gov.in आणि www.nvsadmissionclassnine.in, तसेच www.jnvamravati.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
Contents hide