नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू काश्मीरच्या सर्व नागरिकांपयर्ंत लाभ पोचवण्याच्या हेतूने, आयुष्मान भारत पीएम-जय सेहत योजनेचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला. जिल्हा विकास महामंडळांच्या (डीसीसी) निवडणुकांमुळे आपल्याला लोकशाहीची शक्ती दिसली, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ. हर्षवर्धन, जितेंद्र सिंग व जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा याप्रसंगी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या विभागातील लाभार्थ्यांशीही संवाद साधला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जम्मू-काश्मीरशी खास बंध होता असे सांगत त्यांची इन्सानियत, जमुरियत, काश्मीरियत ही घोषणा आपल्याला मार्गदर्शनपर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीर आयुष्मान भारत पीएम-जय सेहत योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी या योजनेअंतर्गत पाच लाखांपयर्ंतचे उपचार विनाशुल्क असल्यामुळे जीवन सुलभ झाल्याचे सांगितले. सध्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ राज्यातील सहा लाख कुटुंबांना मिळत आहे. सेहत योजनेनंतर २१ लाख कुटुंबांना याचा लाभ मिळेल. या योजनेचा अजून एक फायदा विशद करताना त्यांनी सांगितले की या अंतर्गत फक्त जम्मू-काश्मीरमधीलच सरकारी वा खासगी रुग्णालयातूनच उपचार घेण्याचे बंधन नाही. उलट, या योजनेअंतर्गत देशातील हजारो रुग्णालयातून उपचार घेता येतील.
जम्मू-काश्मिरात आयुष्मान आरोग्य योजना
Contents hide