• Mon. Jun 5th, 2023

ग्रा.पं. निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान ; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

ByBlog

Dec 12, 2020

अमरावती : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या व अमरावती जिल्ह्यात 553 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान; तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या तसेच डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ज्या जिल्ह्यात 50 टक्के किंवा त्याहून अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत. त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील, त्यानूसार अमरावती जिल्ह्यातील 840 ग्रामपंचायतीपैकी 553 ग्रामपंचायती निवडणूका असल्यामूळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
मतदार यादी कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 553 ग्रामपंचायती असून, प्रभाग 1 हजार 823 व सदस्य संख्या 4 हजार 896 आहे.
अमरावती तालुक्यात 46 ग्रामपंचायती (154 प्रभाग व 416 सदस्य), भातकुली तालुक्यात 36 ग्रामपंचायती (116 प्रभाग व 312 सदस्य), तिवसा तालुक्यात 29 ग्रा. पं. (98 प्रभाग व 261 सदस्य), दर्यापूर तालुक्यात 50 ग्रा. पं. (163 प्रभाग व 444 सदस्य), मोर्शी तालुक्यात 39 ग्रा. पं. (131 प्रभाग व 349 सदस्य), वरूड तालुक्यात 41 ग्रा. पं. (139 प्रभाग व 279 सदस्य), अंजनगाव सुर्जी तालुक्यात 34 ग्रा. पं. (117 प्रभाग व 312 सदस्य), अचलपूर तालुक्यात 44 ग्रा. पं. ( 147 प्रभाग व 399 सदस्य), धारणी तालुक्यात 35 ग्रा. पं. (121 प्रभाग व 333 सदस्य), चिखलदरा तालुक्यात 23 ग्रा. पं. ( 71 प्रभाग व 199 सदस्य), नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 51 ग्रा. पं. ( 159 प्रभाग व 419 सदस्य), चांदूर रेल्वे तालुक्यात 29 ग्रा. पं. (93 प्रभाग व 235 सदस्य), चांदूर बाजार तालुक्यात 41 ग्रा. पं. (140 प्रभाग व 381 सदस्य) व धामणगाव रेल्वे तालुक्यात 55 ग्रा. पं. ( 174 प्रभाग व 457 सदस्य) यांचा समावेश आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *