• Mon. Jun 5th, 2023

ग्रामपंचायत निवडणुकीत यवतमाळ जिल्हा भगवामय करा

ByBlog

Dec 26, 2020

यवतमाळ : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोरोना संकटात सुध्दा विकासाची कामे सुरु आहे. या कामाच्या आधारावरच नागरीकांपर्यन्त पोहचा आणि यवतमाळ जिल्हा ग्रामपंचायत निवडणूकीत भगवामय करा, असे आवाहन शिवसेना नेते राज्याचे वनमंत्री संजयभाऊ राठोड यांनी शिवसैनिकांना केले. ते यवतमाळ येथे टिळक स्मारक मंदीरात आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीत बोलत होते.
राज्यात लवकरच ग्रामपंचायत च्या निवडणूका होऊ घातल्या आहे. यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांना विदभार्तील नागपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती व मराठवाडा येथील नांदेड या पाच जिल्हयांची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी दिली आहे. त्याअनुषंगाने विदभार्तील तीन व मराठवाड्यातील नांदेड जिल्हाचा आढावा घेतल्यानंतर आज यवतमाळ जिल्हयाचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत संजयभाऊ राठोड यांनी जिल्हयात सर्वाधिक ग्रामपंचायत वर भगवा फडकविण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. निवडणुकीनंतर शहरासारखाच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी डीपीआर तयार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. पाच जिल्हयातील जवळपास चार हजार पेक्षाही जास्त ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी संजयभाऊ राठोड यांच्यावर पक्षाने सोपिवली आहे. याप्रसंगी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, जिल्हा परीषद अध्यक्षा कालींदाताई पवार, नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, जिल्हा परीषदेचे आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, बाळासाहेब चौधरी,सौ निर्मलाताई विनकरे,सौ लताताई चंदेल,सौ सागरताई पुरी, शैलेश ठाकुर,जेष्ठ मार्गदर्शक परमानंद अग्रवाल,नामदेवराव खोब्रागडे उपस्थित होते. बैठकीला उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, गजानन बेजंकीवार,सलिम खेतानी, प्रविण शिंदे, हरीहर लिंगनवार,दिगंबर मस्के, संजय निखाडे,दीपक कोकास, अँड बळीराम मुटकुळे, राजेश खामनेकर, चितांगराव कदम, उत्तम मामा ठवकर,मनोज नाल्हे, वसंत जाधव,दिपक, काळे, निलेश मैत्रे,विनोद काकडे,निलेश चव्हाण, रवी राठोड,राजूभाऊ बांडेवार, संजय आवारी, शरद ठाकरे,रवी बोडेकर, रविकांत रुडे, प्रमोद भरवाडे,रवींद्र भारती, राहुल सोनुने,संदीप ठाकरे डॉ अनिल नाईक मनोज भोयर मनोज ढगले, संजय कांबळे,राजेंद्र गिरी, राजू दुधे तसेच सर्व तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *