अमरावती : मार्च महिन्यात घोषित झालेल्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी काढलेले बँक खाते व दाखले प्रशासन ग्राह्य धरत नसल्याने आता ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांना नव्याने पुन्हा काढावी लागत असल्याने उमेदवार यांना नाहक आर्थिक भुर्दंड व मानिसक छळास सामोरे जावे लागत आहे.ज्या उमेदवारांनी मार्च महिन्यात निवडणुकीसाठी बँक खाते काढली आहे तेच प्रशासनाने ग्राह्य धरावी अशी मागणी महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्तांना भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे यांनी केली आहे.मार्च महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक लागली होती कोरोना मुळे निवडणूक कार्यक्रमाला स्थगिति देण्यात आली होती आता नव्याने सर्व प्रकिया राबविन्यात येत असल्याने प्रशासन सर्वच कागदपत्रे व बँक पासबुक नवीन मागत असल्यामुळे उमेदवारांना आर्थिक भुर्दंड बसत असून विनाकारण त्रास होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत जुनेच बँक पासबुक ग्राह्य धरा. प्रशासनाकडून ग्रामपंचायत इच्छुक उमेदवारांचा कागदपत्रांसाठी विनाकारण छळ!
Contents hide