अमरावती : कोलकात्याच्या राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणा-या अर्थसहाय्य योजनेसाठी जिल्ह्यातील ग्रंथालयांनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक ग्रंथालय संचालक डॉ. सु. गु. मडावी यांनी केले आहे.
ग्रंथालयांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम, इमारत विस्तार, त्याचप्रमाणे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करणे, ग्रंथालयाचे महोत्सवी वर्ष (सुवर्णमहोत्सव, शताब्दी आदी) साजरे करणे, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण आदी कार्यक्रम राबविणे, बाल ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान बाल कोपरा राबविणे आदींसाठी अर्थसाह्य करण्यात येते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 8 जानेवारी 2021 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Contents hide