• Sat. Sep 23rd, 2023

कोरोनाचा नवा विषाणू नियंत्रणात

ByBlog

Dec 23, 2020

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या रुपानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली. नव्या नियमानुसार, यूकेहून येणार्‍या प्रवाशांपैकी नव्या कोरोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. सरकारने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ब्रिटनहून येणार्‍या विमानांसाठी नवे एसओपी जाहीर केली. ब्रिटनहून येणार्‍या सर्व (पान ६ वर)
वृत्तसंस्था/जिनिव्हा
ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांमध्ये आढळलेले बहुतांशी बाधित हे नव्या विषाणूमुळे झाले असल्याचे समोर आले. त्यानंतर ब्रिटनसह इतर देशातही बाधितांमध्ये नवा विषाणू आढळला. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर देशांनीदेखील ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केली आहे. अशा वातावरणात जागतिक आरोग्य संघटनेकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. हा कोरोनाचा नवीन विषाणू अद्यापही नियंत्रणाबाहेर गेला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकल रेयान यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, कोरोना महासाथीच्या काळात आपण सर्वांना यापेक्षाही अधिक बाधित झालेले पाहिले आहेत. त्यावर नियंत्रणदेखील मिळवण्यात यश आले. अजूनही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नाही. मात्र, आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!