• Mon. Jun 5th, 2023

केवळ १५ रुपयांत मिळणार शुध्द पाणी..!

ByBlog

Dec 22, 2020

मुंबई:राज्याचा परिवहन विभाग आर्थिक तोट्याखाली असल्याने कर्मचार्‍यांचा पगार आणि इतर वेतनाचा प्रश्न नेहमी उद्धवत असतो. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात एसटीचे प्रचंड नुकसान झाले. यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळातर्फे विविध उपाययोजना केल्या जातायत. तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी एसटीने नवा पर्याय शोधलाय.
एसटी विभागातर्फे प्रवाशांना एक लिटर बाटलीबंद पाणी १५ रुपयांत मिळणार आहे. यातून एसटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. नाथजल नावाचे हे बाटलीबंद पाणी टप्प्याटप्प्याने लवकरच एसटीच्या प्रत्येक स्थानकात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
पहिल्या टप्प्यात राज्यातील सात एसटी बसस्थानकात प्राथमिक स्वरुपात ही सोय करण्यात येईल.कोरोना संकटामुळे बाहेर पडण्यासाठी एसटीने हा निर्णय घेतलाय. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी एसटी महामंडळ विविध पर्याय शोधतेय.
एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी एसटीने अवघ्या १५ रूपयांत शुद्ध बाटलीबंद पाणीविक्री सुरू केलीय. जिल्ह्यात एसटीच्या प्रत्येक बस स्थानकात हे नाथजल पाणी प्रवाशांची तहान भागवणार आहे. बस स्थानक आवारातील उपहारगृह, हॉटेल, स्टॉलवर देखील पाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पाण्याच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ होणार असून एसटी यातून मोठय़ा प्रमाणात फायदा होईल. यामुळे आर्थिक संकटातून सावरण्यासाठी एसटीला खूप मोठे सहाय्य होणार आहे. अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विक्रीसाठी ठेवल्यास विक्रेत्याचे परवाने रद्द करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे एसटी डेपोमध्ये आता नाथजलची मोनोपॉली पहायला मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *