पांढरकवडा : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी नामांकन अर्ज भरण्याची ३0 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने आज नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवार व त्यांच्या सर्मथकांनी तहसील कार्यालयात एकच गर्दी केली होती. नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता घोळक्याने आलेल्या उमेदवारांच्या गर्दीमुळे तहसील कार्यालय परिसराला राजकीय यात्रेचे स्वरूप आले होते. कोरोनाचे संपूर्ण नियम या गर्दीने पायदळी तुडविल्याचेही पाहायला मिळत होते.
प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे तहसील कार्यालयात उसळलेली गर्दी शहरात चचेर्चा विषय ठरली. जिड्डेवार भवन बचत भवन व तहसील कार्यालयाकडे जाण्याचा मार्ग उमेदवारांच्या गदीर्ने पूर्णत: जॅम झाल्याने नागरिकांची कार्यालयीन कामे पूर्णत: खोळंबली गेल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी दिसून येत होती. तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर कार्यालये सुरु झाल्याने नागरिकांनी कार्यालयीन कामाकरिता तर उमेदवारांनी नामांकन दाखल करण्याकरिता तहसील कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती. वाहनेही नियमबाह्य पद्धतीने उभी केल्या गेल्याने मुख्य रस्त्यावरही वेळोवेळी जॅम लागताना दिसत होते. २८ डिसेम्बरची ही राजकीय यात्रा पाहून प्रशासनही थक्क झाल्याने २९ डिसेंबरला प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेऊन तहसील कार्यालयात गर्दी उसळणार नाही याची खबरदारी घेतली. १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची ३0 डिसेंबर ही आखरी तारीख असल्याने उमेदवार घोळक्याने तहसील कार्यालयाकडे येत आहेत. सदस्य निवडीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने पॅनल निवडून आणण्यावर पुढार्यांचा जोर असणार आहे. सरपंच पदाची सोडत झाल्यानंतर सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्यात येणार असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता लक्षात घेता पॅनलमध्ये विश्वासू उमेदवारांचा भरणा केला जात आहे. तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतेची निवडणूक होणार असल्याने कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीच्याच गरमागरम चर्चा रंगत असल्याचे गावगाड्यांमध्ये दिसून येत आहे.
केळापूर तहसीलवर ग्रा.पं. उमेदवारांची उसळली गर्दी.!
Contents hide