• Tue. Sep 19th, 2023

केली नाही देशसेवा…

ByBlog

Dec 19, 2020
  अंग जर्जर व्याधीने
  मनी विकार दडले ।
  तुझ्या जीवनी मानवा
  कुठे सत्कर्म घडले? ।।
  खात होता मांस,मच्छी
  अंगी भूतदया नाही ।
  तुझे नयन आताही
  कामवासनेत राही ।।
  देशामध्ये राहूनही
  केली नाही देशसेवा ।
  कर्माविना सांग वेड्या
  कोण मिळवेल मेवा ।।
  कष्टाविना खाणाऱ्यास
  अन्न कसे पचणार? ।
  रोज आयते खाणारे
  सडकीने धावणार ।।
  पोट फुगणार ऐसे
  जणू गर्भवती बाई ।
  तुझ्या वक्र दृष्टीमुळे
  नाही सुरक्षित ताई ।।
  जसे करशील तसे
  फळ नक्कीच मिळेल ।
  कर्म अयोग्य राहता
  काळ तुजला गिळेल ।।
  विकारास पळवून
  देशासाठी कर काही ।
  तुझी किर्ती मज आता
  ऐकायची दिशादाही ।।
  शब्दसखा
  अजय रमेश चव्हाण
  तरनोळी
  ता.दारव्हा,जि.यवतमाळ
  मो.८८०५८३६२०७