नवी दिल्ली:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. प्रकृतीत बिघडल्याने त्यांना रविवारी रात्री उशिरा एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे, काल त्यांचा वाढदिवसही होता. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील मोतीलाल वोरा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु, कोरोना संक्रमणावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती.
दीर्घकाळ काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणार्या मोतीलाल वोरा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे राज्यपालपदाची जबाबदारी हाताळली होती. मोतीलाल वोरा हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते होते. २0१८ साली वाढत्या वयाचं कारण देत राहुल गांधी यांनी त्यांची कोषाध्यक्षपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्या हाती सोपवली होती. अहमद पटेल यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे, काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासहीत अनेक काँग्रेस नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन
Contents hide