अमरावती : सख्ख्या भाच्याचा वाढदिवसात सामील होऊन आशिर्वाद देऊन परत येताना मामाच्या दूचाकी ला सायंकाळी विरुध्द दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मामासह दोघाचा मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील नागपुर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेवर विटाळा नजिक घडली.या अपघातात अक्षय श्रावण बोरकर (२0 )चा जागीच मुत्यु झाला तर रोशन बंडू तिघरे (२७)यांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. पवनार येथील राहणारे दोघेजण तालुक्यातील अशोक नगर येथुन भाच्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून पवनार येथे परत जातांना हा अपघात घडला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय र्शावण बोरकर हा आपल्या भाच्याचा वाढदिवसेला हाजेरी लावण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथुन धामणगांव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर येथे रोशन बंडू तिघरे यांच्या कडे. आला होता.वाढदिवस साजरा करुन परत पवनार येथे दुचाकी क्रमांक एम.एच.३२ यु ९५७५ दुचकी वाहनाने संध्याकाळी जात असतांना नागपुर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या विटाळा जवळ विरुध्द दिशेने येणार्या अज्ञात वाहनाने दूचाकी ला जोरदार धडक दिली.यामध्ये अक्षय श्रावण बोरकर (२0) यांचा घटना स्थळावर जागीच मृत्यु झाला.तर रोशन बंडू तिघरे (२७) यांचा सांवगी मेघे येथील रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यु झाला. मंगरुळ दस्तगीर पोलीसांनी माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला असुन पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर तीडके यांनी घटना स्थळाला भेंट दिली .अधिक तपास पोलीस करीत आहे.