वर्धा : महामंडळाच्या अनेक फेर्या पूर्ववत करण्यात येत आहे. प्रवाशांची संख्या देखील वाढू लागली आहे. अशात महामंडळाच्या बसगाड्या सुस्थितीत असणे आवश्यक आहे. पण, अनेक बसगाड्यांची अवस्था बिकट असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
बसमधील सिटची अवस्था गंभीर असते. काही बसगाड्यांत सिट तुटलेल्या, धुळीने माखलेल्या आढळतात. बरेचदा सिट नसण्याचेही अनुभव प्रवाशांना येतात. खिडकीच्या काचा तुटलेल्या अवस्थेत आढळतात. तुटलेल्या काचांमुळे प्रवाशांना थंडीत कुडकुडत प्रवास करावा लागतो. ही बाब नित्याचीच झाली आहे. याबाबत बरेचदा प्रवाशांकडून ओरड देखील होते.पण, एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येते.
Contents hide