• Sun. May 28th, 2023

एकतीस डिसेंबर

ByBlog

Dec 31, 2020

ती सायंकाळ आज जल्लोषात निघाली होती.सगळीकडं डीजे वाजत होता.सगळीकडं दिवाळीसारखी रोशनीई दिसत होती.सगळे मजेत होते.
ती कॉलेजची मुलं.आज नववर्षाचं स्वागत करायला सज्ज होते.आज त्या मुलांसोबत त्या मुलीही डी जे च्या तालावर थिरकणार होत्या.सर्वांमध्ये नववर्षाच्या स्वागताचा उत्साह संचारला होता.
याच कॉलेजला एक राहूल नावाचा मुलगाही उपस्थीत होता.त्याला तसंही हे नववर्ष आवडत नव्हतं.त्याला वाटायचं की हे नववर्ष इंग्रजांचं असून ही विदेशी मंडळी काही ना काही खुळ घेवून येतात.त्याचा त्पास आपल्यालाच होतो.ज्याप्रमाणे इंग्रज आले.त्यांनी भारताला गुलाम केलं.नव्हे तर याच इंग्रजांनी भारताला गुलाम करतांना ज्या भारतात जी मंडळी आधीपासून राहात होती.त्यांच्या संस्कृत्या मोडल्या आणि आपल्याच संस्कृत्या या भारतात लागू केल्या.खरं पाहता ही कालगणना आपली नसून ह्या भारतीय रहिवाश्यांनी ही इंग्रजी कालगणना मानायला नको.त्याचबरोबर हा सण साजरा करायला नको असंही वाटत होतं.त्याचबरोबप त्याला ह्या एकतीस डिसेंबरचा दरवर्षी रागच यायचा.
राहूलला या एकतीस डिसेंबरचा यासाठी राग यायचा की हा दिवस साजरा करतांना दरवर्षी कॉलेजची मुलं डी जे लावायची.त्या डीजेवर थिरकायची नव्हे तर तसं थिरकत असतांना मुलं मुली शैतान शिरल्यागत मदिरा सेवन करायची.शिवाय सोबतच पार्टी करतांना मांस खायची.त्यानंतर मुलं मुली बरंच काही करुन जायची.कॉलेजच्या मुलांचा कार्यक्रम म्हणून मायबापही मुलांमुलींना मुभा द्यायचे.त्यातच ती मुलं या रात्री काय काय करतात हेही त्या मायबापांना माहित व्हायचं नाही.यातूनच या रात्री कुणावर नशेत बलत्कारही होत असत.तेही मायबापांना माहित होत नव्हतं.
जुन्या वर्षाला तिलांजली देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे कसं व्यस्त होते.त्याचबरोबर सगळे प्रसन्न होते.
राहूल मात्र दुःखी होता.त्याला वाईट वाटत होतं.त्याला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटत होतं, ते कळायला मार्ग नव्हता.त्याच्याकडं पाहून प्रत्येकाला चिंता पडली होती की तो का उदास असावा.तशी सुरक्षा त्याच्याजवळ गेली.विचारणा केली त्याची.म्हणाली,
“राहूल असं काय झालं की तू उदास आहेस.ये नाचायला.अरे आज या वर्षीचा शेवटचा दिवस.ये आनंद व्यक्त करुया.”
“मला हे नववर्ष तसेच हे जुनं वर्ष आवडत नाही.”
“का बरं?हे नवीन वर्ष व जुनं वर्ष न आवडण्याचं कारण?”
“हे इंग्रजांचे वर्ष आहे.आपण मुळात भारतीय.आपण आपली संस्कृती व आपले वर्ष वापरायला हवे.जी आपली संस्कृती कधी कोणाला मांस खायला शिकवीत नाही.कधी कोणाला मदिराप्राशन करायला शिकवीत नाही.तसेच कधी कोणाला बिभत्स वागणंही शिकवीत नाही.हं प्रत्येक संस्कृतीत कमीजास्तपणा असतोच.तसा आपल्याही संस्कृतीत आहे.यासाठी आपण आपली संस्कृती सोडून विदेशी संस्कृतीप्रमाणे चालू नये.”
“अं जावू दे ना राहूल आता.ही विदेशी संस्कृती अन् भारतीय संस्कृती का घेवून बसला.ये नाचायला.काय फरक पडतो विदेशी संस्कृतीनुसार चाललं तर…….जीवनात परीवर्तन गरजेचे आहे.आपण
ते घ्यावं. स्विकार करावा त्यांचा.नवनवीन गोष्टी स्विकारायलाच हव्या.”
“हो,तुझं म्हणणं बरोबर आहे.पण ह्या विदेशी संस्कृत्या स्विकारल्यानं बराच फरक पडतो.त्याचं कारण सांगू.”
“सांग बरं. ती उत्सुकतेनं म्हणाली.त्याचबरोबर तो म्हणाला,
“हे बघ,ही विदेशी मंडळी काहीही खातात.काहीही पितात हे तरी मान्य करशील की नाही.”
“हो,हे मी मान्य करते.”
“मग मला सांग.हे काहीही खाणं आपण शरीर स्विकारत असेल का?”
“म्हणजे?”
“म्हणजे ते किडे,मुंग्या खातात.गोम खातात.नशा यावी म्हणून सापाचा दंश करुन घेतात.हे तुला पचनी पडू शकते काय?”
“नाही.”
“यातूनच आजारही होतात हे तरी माहित आहे का?”
“नाही.”
“म्हणूनच मला विदेशी संस्कृती आवडत नाही.हे त्यांचे खाणे पिणे त्यांच्या भागासाठी ठीक आहे.कारण त्यांच्या देशात त्या त्या महिण्यात तसा बदल होतो.म्हणून त्यांनी एकतीस डिसेंबर पाळला तरी त्यांच्या शरीरावर मदिरा आणि मांसाचा तेवढा परीणाम होणार नाही.माहित आहे तुला.ज्यांनी आपल्याला एकतीस डिसेंबर दिला.त्यावेळी त्यांच्या भागात प्रचंड थंडी पडते.म्हणून ते ख्रिसमस पासूनच मदिरा आणि मांस खाणे सुरु करतात.अगदी उत्सव साजरा करतात.त्यातच शरीरात गर्मी यावी म्हणून ते नृत्यही करतात.पण आपला देश तशा हवामानाचा नाही.आपला देश उष्ण कटीबंधातील देश आहे.इकडील वातावरण मदिरा खाण्याला व मांस खाण्याला पोषक नाही.शिवाय तुला सांगतो की एखाद्या वाळवंटातील माणसानं पाण्याचा अपव्यय करतो म्हटलं तर चालेल का?नाही ना. त्यामुळंच सांगतो की परीवर्तन ही जरी काळाची गरज असली तरी कमीतकमी काही काही गोष्टी विदेशी संस्कृतीनुसार नक्कीच करु नये.आपला नववर्ष गुढीपाडवा.ज्या दिवशी थंडी जावून नव्या मोसमाला म्हणजेच उन्हाला सुरुवात होते.ज्या दिवसापासून शिशिर जावून वसंताला सुरुवात होते.ज्या दिवसापासून झाडाला पालवी फुटणं सुरु होते.अगं निसर्गच आपल्यातला नवा बदल या गुढीपाडव्याच्या महिण्यात स्विकारतात.मग आपण तर मानव जात.आपण गुढीपाडव्यापासून नवा महिना मानायला काय हरकत आहे? अगं हा डिसेंबर आपला महिना नाही.”
“आता मला समजलं की आपली संस्कृती कशी आहे आणि त्यांची कशी? आपण काय खायला हवं आणि काय नको? मी आजपासून हा एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्ष साजराच करणार नाही. आजपासून आपला नववर्ष मी आपला गुढीपाडव्यालाच साजरा करीन.”
“आणि हं,हा कोरोनाही त्यांचीच देण आहे. ज्याचे परीणाम आपणच नाही तर सर्व जग भोगत आहे.ज्याच्यामुळे आपल्या देशातील कित्येकांचे मायबापही हिरावले गेले.”
राहूलच्या म्हणण्यानुसार सुरक्षा काय समजायचं ते समजली.तिनं मुलांनाही समजावून सांगीतलं.तसा तो एकतीस डिसेंबरचा उत्साह मावळला होता.डी जे बंद झाला होता.मदिरा आणि मांसही खाण्यात उत्सुकता राहिली नाही.सगळे विचार करीत होते गुढीपाडव्याचा.हा गुढीपाडवा साजरा करण्याची जे ते वाट पाहात होते.कारण आज राहूलच्या बोलण्यानुसार गुढीपाडव्याचं महत्व पटलं होतं.

    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *