• Fri. Jun 9th, 2023

उपाशीपोटी कार्यकर्ता

ByBlog

Dec 19, 2020
  होऊ नकोस कधी तू
  कार्यकर्ता उपाशी ठेवून पोट
  खरेदी करून घेतील तुला
  देऊन पाचशे हजाराची नोट
  तुझे सिद्धांत तुझे विचार
  कसे धरतील उपाशीपोटी तग
  कारण खूपच धूर्त आहे
  हे सारे आजूबाजूचे जग.
  कमकुवत पाहून तुला
  चिरडून टाकतील पायदळी
  नाहक मित्रा तू मग
  जाशील यांच्या बळी.
  कार्यकर्ता हो तू नक्की
  पण अगोदर कर उदरभरण
  कारण खूपच घाणेरडे आहे
  आपल्या देशाचे राजकारण
  पोटापाण्याचा प्रश्न सोडव तू
  मिळवून रोजगार नोकरी ठोक
  नाहीतर तुला मग म्हणतील
  रिकामटेकडा सारेच लोक
  शिकून तू चांगले इथे अगोदर
  मिळवून दाखव नोकरी भक्कम
  मग राजकारणात येऊन तू
  खर्च कर स्वतःची रक्कम
  उपाशीपोटी कार्य करशील तर
  राहशील केवळ तू एकलकोंडा
  विनाकारण कार्यकर्ता होऊन
  पाडू नकोस पायावर धोंडा
  गणेश रामदास निकम
  चाळीसगाव*गणेशपूर
  मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *