नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला आहे. विशेषत: विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. परभणीतील तापमानाचा पारा ५.६ अंश सेल्सियस पयर्ंत खाली आला असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील काही भागांत थंडीची लाट पसरली आहे. पुढील दोन दिवस या ठिकाणी थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील थंडीचा कडाका कायम आहे. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील थंडीचा कडाका वाढला आहे.
Contents hide