• Mon. Jun 5th, 2023

उठा माणसांनो….

ByBlog

Dec 21, 2020
  नयनी सुमार्ग । दिसता दिसेना ।
  मनात वसेना । सेवाभाव ।।
  गरजवंतास । हसलो नेहमी ।
  दिली नाही हमी । मदतीची ।।
  दिवस सरले । आता वृद्ध झालो ।
  शरणात आलो । पांडुरंगा ।।
  वर्तन चुकले । काय सांगू कथा ।
  आहे अशी व्यथा । त्याचमुळे ।।
  जाण कर्तव्याची । कुठे होती मला ।
  प्राप्त केली कला । नाही कधी ।।
  पैशाच्या गुर्मीत । राहून जगलो ।
  ऐटीत बसलो । खुर्चीवर ।।
  माणुसकी कुठे । होती माझ्यापाशी ।
  वाटे आहे काशी । निद्रास्थान ।।
  झोपेत राहलो । म्हणून झुकलो ।
  संपता शिकलो । माणुसकी ।।
  वृद्धत्वाची दैना । अभंगी मांडतो ।
  जागृत करतो । प्रत्येकास ।।
  उठा माणसांनो । सत्यमार्गी लागा ।
  मिळणार जागा । योग्यतेची ।।
  वागसाल जर । वाईट बनून ।
  जाणार त्रासून । वृद्धपणी ।।
  म्हणून अजय । म्हणतो सुधरा ।
  आयुष्यात जरा । कर्म करा ।।
  शब्दसखा-अजय रमेश चव्हाण
  तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ।।
  मो.८८०५८३६२०७।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *