यवतमाळ : माजी खासदार स्व. उत्तमरावदादा पाटील यांना आज जयंती निमित्त र्शध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या लोणी या गावी करण्यात आले होते. राजकीय क्षेत्रातील असंख्य दिग्गजांनी दादाच्या समाधी स्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. इब्टा शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिवाकर राऊत यांनी आपल्या शिक्षक कार्यकर्त्यांसह जाऊन दादांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली यावेळी त्यांनी दादांचे जेष्ठ पुत्र राजु पाटील, नवनिर्वाचित जिल्हा बॅंकेचे संचालक मनिष पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी मनिष पाटील व राजु पाटील यांनी इब्टा शिक्षक संघटनेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन इब्टाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत यांना दिले.
इब्टाकडून स्व. उत्तमराव पाटील यांना आदरांजली
Contents hide