• Mon. Jun 5th, 2023

आमदार देवेंद्र भुयार यांची ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा !

ByBlog

Dec 30, 2020

मोर्शी : मोर्शी मतदार संघातील रिध्दपूर विकास आराखड्यामध्ये प्राचीन काळातील महानुभाव पंथीय मंदीरांचा समावेश करून १०० कोटी विकास निधीस मंजूरी देऊन रिद्धपुर तीर्थक्षेत्र विकास करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
महानुभाव पंथाची काशी व मराठी साहित्याची आद्यभूमी असलेल्या रिद्धपूरचे महात्म्य लक्षात घेऊन रिद्धपुर येथील विकास आराखडा तत्काळ मंजूर करून देण्यासाठी तसेच रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, यासाठी शासन सकारात्मक असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. रिध्दपूर महानुभाव पंथीयांचे पावन तिर्थक्षेत्र आहे. रिध्दपूर तिर्थक्षेत्राप्रमाणे महानुभाव संप्रादायाची अमरावती जिल्ह्यात इतरत्र सुद्धा पावन स्मृतीस्थळे आहेत.
महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी व गोविंद प्रभु, दत्तात्रय प्रभु, श्रीकृष्ण महाराज यांनी वास्तव्य केले असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरीक येतात. येथील सर्व महानुभाव पंथीय मंदीरे अतिशय जुणी असून जिर्ण झालेली आहेत. मंदीरात ये-जा करण्यास असलेली रस्ते खराब झालेली आहेत, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्याप्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच रस्ते, नाली, सभागृह, शौचालय, पिण्याची पाण्याची सोय, सौरक्षण भिंत, स्मशानभूमी, दफनभूमी, बाग बगीचा सौंदर्गीकरण, विश्रामगृह, वॉल कम्पाऊंड बांधकाम करणे, दिवा बत्ती, ग्रंथालय, वाहनतळ, वृक्षारोपण व वृक्षलागवड, सुविधायुक्त बस स्टॅन्ड, हायमास्ट स्ट्रीट लाईट, घणकचरा व खत निर्मीती केंद्र आदी कामे प्राथमिकतेने करणे अत्यंत आवश्यक आहेत.
मोर्शी वरुड तालुक्यातील संपूर्ण महानुभाव स्मृतीस्थळांचे विकासाकरीता निधीची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे रिध्दपूर विकास आराखड्यास मंजूरी देऊन १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात यावा याकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, यांच्या उपस्थितीत महानुभाव पंथाचे शिष्टमंडळ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जयराजबाबा पंजाबी, अखिल भारतीय महानुभाव पंथाचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, पंकज हरणे, सरपंच गोपल जामठे, महेंद्र देशमुख, गाऊस अली, मनोज टेकाडे, यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन रिद्धपुर तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *