• Mon. Jun 5th, 2023

आदिवासी परंपरा, निजामकालीन, ब्रिटिशकालीन पुरावे सरकारने स्वीकारून बेरार प्रारंतातील कोळी महादेव समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चा शासन निर्णय निर्गमित करावा डॉ.अनुपकुमार यादव प्रधान सचिव आदिवासी विकास यांचेकडे बेरार कोळी महादेव शिष्टमंडळाची मागणी

ByBlog

Dec 15, 2020

मुंबई :अधिवेशनाचे पहिल्याच दिवशी आज रोजी बेरार कोळी महादेव समाजबांधव शिष्टमंडळाने आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव भा. प्र. से.यांना निवेदन देऊन
सातपुडा महादेवाच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या बेरार प्रांतातील अमरावती महसूल विभाग आदिवासी कोळी महादेव जमातीला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कोळी महादेव बेरार संघर्ष समितीचे पदाधिकारी उमेशराव ढोणे, गोपालभाऊ ढोणे ,सुधाकर घुगरे, राजेंद्र कोलटके, विलासराव सनगाळे, जगनन्नाथ तराळे,नंदकिशोरअपोतीकर, बाळू जुवार,मनोज धनी, विठ्ठलराव संनगाळे , नाजुकराव खोडके, मधुकरराव तराळे, , आदींच्या उपस्थितीमध्ये निवेदन देऊन त्याची प्रत मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांनाही देण्यात आली. दिलेल्या निवेदनात कोळी महादेव समाजाचे पूरक निवेदन जसे की आदिवासी परंपरा निजामकालीन, ब्रिटिशकालीन पुरातन पुरावे सन 2017पासून सातत्याने सरकारला देऊन पाठपुरावा करत आहे.आमच्या मागणीचे निवेदनावर तातडीने न्यायोचित शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांनाही दिलेल्या पत्रात सरकारचे आदिवासी विकास विभाग यांना आदेश देण्यात यावे अशी विनंती सदर निवेदनातुन केली आहे.ठाकरे सरकारने लवकरच निर्णय घ्यावा या साठी संपूर्ण महाराष्ट्रात कोळी महादेव समाज आक्रमक पवित्रा घेण्यासाठी सर्वत्र बैठका सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *