• Sun. Jun 4th, 2023

आकांत

ByBlog

Dec 29, 2020
  आज अचानक / पाऊस पाहुणा
  जाता तो जाईना / काय करू ?
  शेतामध्ये पीक / पावसाने ओले
  झाड-पान हाले / वेदनेने
  धुऱ्यावर उभा / शेतीचा मालक
  पावसाचा धाक / सतावतो
  वावरात कोबी / बाजूला सांभार
  डोयीचे अंबर / हासताये
  मेथी नि पालक / अशा ओल्या झाल्या
  पानावर अळ्या / खेळतात
  वांगे – टमाटर / तेही दूर-दूर
  डोळा महापूर / घर ओले
  पावसाने सारे / पिक मातीमोल
  पोशिंद्याचे हाल / स्वातंत्र्यात
  संसदेत गेली / माणसं हुशार
  जनता लाचार / घरी-दारी
  माती झाली ओली / सारे झाले ओले
  झरतात डोळे / एकांतात
  दिल्लीच्या वाटेने / निघाला बापडा
  आकाशी कावळा / आनंदित
  अर्जुन मेश्राम,
    लोक विद्यालय, गांगलवाडी
    ता. ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर
    ९६०४०१३६६७
    arjunmeshram001@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *