• Mon. Jun 5th, 2023

आंदोलनामुळे शेतमालाचे भाव गडगडले ; शेतकर्‍यांनी मालावर नांगर फिरवला

ByBlog

Dec 23, 2020

नवी दिल्ली : केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागण्यांसाठी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाब आणि हरयाणामध्ये भाव गडगडले आहे. तर अमृतसरसह दिल्लीला लागून असलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतमालाला भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच शेतकरी आपल्या शेतात आलेले पीक नाममात्र किंमतीला विकण्याऐवजी शेतमाल असलेल्या जमिनी नांगरत आहेत. गहू आणि इतर धान्यांना ज्याप्रमाणे किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याचप्रमाणे इतर पिकांनाही दिली जावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सराई गावातील अजित सिंग या शेतकर्‍याने पिकवलेल्या फ्लॉवरला एक रुपये प्रति किलोपेक्षा कमी किंमत मिळाली. त्यामुळेच संतापलेल्या अजित सिंग यांनी एक एकरच्या शेतातील फ्लॉवरच्या पिकावर थेट नांगर फिरवला.
अजित यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, बियाणे खरेदी, खते, औषधे वगैरेंसाठी एकूण ३५ ते ४0 हजार रुपये खर्च केले होते. या पिकामध्ये आपल्याला एक लाखांपयर्ंतचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती, मागील वर्षी फ्लॉवरला ११ ते १४ रुपये दर मिळाला. मात्र आता मला घाऊक बाजारपेठेमध्ये एक रुपया प्रति किलोपेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे पीक काढून ते बाजारात घेऊन जाणेही तोट्याचे आहे. म्हणूनच मी त्यावर नांगर चालवण्याचा निर्णय घेतला,असे अजित म्हणाले.
सरकार शेतकर्‍यांना केवळ गव्हाचे पिक घेण्याऐवजी भाज्या पिकवण्याचा सल्ला देते. मात्र त्यांनी भाज्यांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर केलेली नाही. आज भाज्यांनाही किमान आधारभूत किंमत मिळत असती तर आमची निराशा झाली नसती असे अजित सिंग सांगतात.
शेतमालाचे ट्रक दिल्लीत जाऊ शकत नसल्यानेच शेतमालाच्या किंमती गडगडल्याचे .त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमधूनही शेतमालाला फारशी मागणी नसल्याचे अजित सांगतात.अजित यांच्याप्रमाणेच सतनाम सिंग यांनीही ३0 किलोची फ्लॉवर घाऊक बाजारपेठेमध्ये केवळ २२ रुपयांना विकली. मला प्रति किलो ७५ पैसे असा दर मिळाला. मात्र उत्पादन शुल्क हे प्रति किलो दोन रुपये इतके होते, असे सतनाम सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *