• Sat. Sep 23rd, 2023

अवैध दारू विक्रेत्यांवर वरुड पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिबंधत्मक कारवाई

ByBlog

Dec 31, 2020

वरुड : वरुड तालुक्यात होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वरुड पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने ३९ अवैध दारू विक्रेत्यांवर संबंधित कायद्याअंतर्गत ११0 कलमानुसार कारवाई केली. निवडणुका काळात दारू वाटप करून लोकशाही प्रणालीला गालबोट लावणार्‍या अवैध दारू विक्रेते व चिल्लर दारूची ठोक विक्री करणार्‍या परवाना धारक दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने मागील काळात ३ किंवा त्यापेक्षा अवैध दारू विक्रीचे गुन्हे असलेल्या तालुक्यातील ३७ अवैध दारू विक्रेत्यासह २ परवानाधारक दारू विक्रेत्याविरुद्ध स्थानीक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या सर्व अवैध विक्रेत्यांना वरुड पोलिसांनी नोटिसा द्वारे हजर राहण्यास सांगितले. या सर्वांना अमरावती स्थानिक गुन्हे हजर करण्यात आले.स्थानिक गुन्हे प्रतिज्ञापत्र लिहून ,सदरील प्रतिज्ञापत्रात ३ वर्षात पुन्हा असा गुन्हा केल्यास १ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यासंदर्भात हमी पत्र घेवून जमानतिवर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वरुड पोलिसांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज पयर्ंतची ही सर्वात मोठी कामगिरी असून या वर्षी निवडणुका शांततेत पार पडतील असे नागरिक बोलू लागले आहे.अधिकारी र्शनिक लोढा यांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केल्या जात आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!