• Sat. Jun 3rd, 2023

अल्पसंख्यांक क्षेत्रातील कब्रस्थान दुरूस्ती संदर्भात राकों नेता संजय खोडके यांनी घेतला आढावा…

ByBlog

Dec 23, 2020

अमरावती : अमरावती विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल नागरी परिसरातील कब्रस्थान व अंत्यविधी जागेची दुरुस्ती करण्याकरिता अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर राज्याचे अल्पसंख्यांक विकास , औकाफ , कौशल्य विकास व उद्दोजकता मंत्री नामदार नवाबजी मलिक यांनी अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम अंतर्गत अमरावती करिता ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे . या अंतर्गत प्रत्येकी २०-२० लक्ष निधीतून कब्रस्थानाची दुरुस्ती व हायमास्ट लाईट बसविणे यासह अन्य सुविधांची कामे होणार आहे . या संदर्भातील नियोजन व करावयाची कामे या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता संजय खोडके यांनी कब्रस्थान कमेटी व स्थानिकांशी चर्चा केली . यावेळी मनपा आयुक्त प्रशांत रोडे , नगर रचना सहायक संचालक श्री उईके , शहर अभियंता रवींद्र पवार , माजी नगरसेवक अब्दुल रफिक उर्फ रफ़ू पत्रकार आदीसह कब्रस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते . कब्रस्थानात अंत्यविधी साठी आवश्यक सुविधांची पूर्तता व्हावी , याबाबत संजय खोडके यांनी प्रत्यक्ष पाहणी करीत स्थानिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या . अल्प संख्यांक बहुल क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरीने प्रयत्न सुरू असून तूर्तास कब्रस्थांनासाठी निधि प्राप्त झाल्याने याचे योग्य नियोजन करून सदर कामाला ८ दिवसांमध्ये कार्यारंभ होईल.यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडणार नसून चांगल्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . लालखडी येथील कब्रस्थानची जागा लहान पडत असल्याने लगतच्या ९ एकर जमिनीवर कब्रस्थानासाठी वाढीव आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्याने , या संदर्भातही मनपा प्रशासनाकडून योग्यते नियोजन केले जाईल , असेही राकॉ नेते संजय खोडके यांनी सांगितले . यावेळी लालखडी व रहमत नगर कब्रस्थान कमिटीचे अहेमद खान , नियामत खान , शेख अन्सार , अनिस खान , सय्यद वसीम टाईल्स , मजीद किराणा , हाजी सैफुल्ला ,मुन्ना शाह , सलीम टाईल्स , अब्दुल मजहर , अब्दुल मुस्ताक ड्रायवर , रहेमत शाह , शकील शाह , आझाद खान , रफिक उल्ला बेकरी , बिसू शाह , शेख रेहान , हमीद ठेकेदार , मेहमूद शाह , आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता संजय खोडके यांचा सत्कार करून निधी उपलब्धी बद्दल आभार मानले . दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर येथील व्यापार्‍यांच्या समस्या जाणून घेतांना संजय खोडके यांनी या ठिकाणी मूलभूत सुविधांची उपलब्धी , वीज उपकेंद्रासाठी जागा निश्चितीसाठी मनपा अधिकार्‍याशी चर्चा केली . यावेळी ट्रान्सपोर्ट नगर चे व्यापारी युनूस पठाण , शाकीर उर्फ गुड्डू भाई , तमीज खान , सलीम जावेद , सय्यद इरफान अली , मुश्ताक कुरेशी , सय्यद जावेद , मोबीन भाई मेकॅनिक , अमजद मेकॅनिक , शेख पेंटर, तसेच निसार मन्सुरी ,ऍड .शोएब खान , अफजल चौधरी , गाझी जाहेरोश , सनाउल्ला खान ठेकेदार , सनाउल्ला सर , अख्तर बेग , नदीम मुल्ला , मोईन खान , सय्यद साबीर , हबीब खान , हब्बु भाई , सादिक शाह , शेख इम्रान , फहिम मेकॅनिकल , नसीम पप्पू ,फारुख भाई मंडपवाले , शमीमुल्लाह खान , युनूस पठाण , अशफाख टाईल्सवाले , आहद अली ,डॉ अब्दुल रहीम पपू , भूरूभाई टाईल्सवाले , सर्व जनाब राशिद , वाहिद , रफिक ,हब्बु भाई, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *