मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेता अमिताभ बच्चन यांनी चहावर आधारित एक कविता ट्विटरवर शेअर केली होती. या कवितेवरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. बिग बींनी ही कविता चोरल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे या महिलेची माफी मागत या कवितेचे मूळ कवी माहित नसल्यामुळे ही चूक झाल्याचे स्पष्ट केले आहे.
अलिकडेच बिग बींनी ट्विटरवर चहावर आधारित एक कविता शेअर केली होती.मात्र, ही कविता आपण लिहिली असून बिग बींनी ही कविता शेअर करत साधे क्रेडिटदेखील दिले नाही, असे टीशा अग्रवाल यांनी म्हटले होते. टीशा यांनी बिग बींच्या कमेंट सेक्शनमध्ये याविषयी मत व्यक्त केले होते. सोबतच स्वत:च्या फेसबुक पोस्टमध्येही याविषयी लिहिले होते. त्यानंतर बिग बींनी एक नवीन ट्विट करुन टीशा यांची माफी मागितली आहे.
या ट्विटचे श्रेय टीशा अग्रवाल यांनी दिले पाहिजे. ही मूळ कविता कोणाची आहे हे मला ठावूक नव्हते. मला कोणी तरी ही पाठवली होती. मला ही कविता छान वाटली त्यामुळे मी ती पोस्ट केली होती, असे म्हणत बिग बींनी जाहीरपणे टीशाची माफी मागितली आहे.
दरम्यान, बिग बींनी शेअर केलेली कविता ही टीशा अग्रवाल यांची असून त्या एक कवियित्री आहेत. त्यांनी ही कविता २४ एप्रिल २0२0 मध्ये लिहिली होती. तसंच त्यांनी ती फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर हीच कविता बिग बींनी श्रेय न देता शेअर केली होती. मात्र, आता त्यांनी जाहीरपणे टीशा यांची माफी मागितली आहे. बिग बी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ते त्यांच्या वडिलांचे विचार किंवा एखादी आवडलेली कविता, विचार ट्विटरवर शेअर करत असतात.
अखेर बिग बींनी मागितली त्या महिलेची माफी
Contents hide