• Mon. Jun 5th, 2023

स्त्री साहित्यः नवी दिशा आणि आव्हाने….

ByBlog

Nov 28, 2020

जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कुणाची पाहू नका हे सार जग जिंकायचे आहे हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळ आहे जिंकल्या शिवाय राहू नका.
असा संदेश डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना दिला आहे, तिला सक्षम केले संविधानाचे पंख देऊन हर जीव मुक्त झाला आहे.
खरे वास्तव मांडताना तितक्याच गतीने आज ही महिलांना दुःख भोगावे लागते. म्हणूनच आजचा विषय जरा मी वेगळा घेतला आहे.
डाँ. बाबासाहेब जन्माला आले नसते तर काय स्थिती असती , भारत आधुनिकीकरणाच्या उंच शिखरावर चढला असता काय.याचे उत्तर नाही असेच येणार आहे कारण विषमत्ता, वर्ण, वाद जातीवाद या भारतात प्रचंड प्रमाणात आहे.म्हणून च महिलांनी पेटून उठायला पाहीजे. पुरूषापेक्षाही दोन पावले पूढे तिचे पावले आहेत. हिंदू कोडबिल पास व्हावे म्हणुन डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किती प्रयत्न केले शेवटी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्या
विचारातुन ,संविधातुन. बुध्द आणि धम्मातून हे एक सत्य आहे की महिलांच्या दुःखाने ते स्वतःदुःखी होत असत. तेव्हा त्यांना वाटायचे यांचे संपूर्ण दुःख जर मी दूर करू शकलो तर..? याच प्रश्नातुन हिंदू कोडबिल बनविण्यात आले पण पंडीत नेहरूच्या नाराजी मुळे ते बरखास्त करण्यात आले आहे. यांचे त्यांना प्रचंड दुख झाले. म्हणुनच महिलांच्या उत्थानासाठी त्यांनी महान कार्य केले. बाळबाळतींण साठी रजा दिली कारण आई बाळाची सर्वतोपरी काळजी घेते बाळावर संस्कार करते. आईचे प्रेम मुलांना मिळावे म्हणून सहा महीण्यांची सुट्टी आहे.कामाचे तास ठरवून पात्रते प्रमाणे काम आणि सन्मान आहे. संपत्ती हिस्सा आहे, पतीच्या संपत्ती ती पुर्णता सहभागी आहे. एक पत्नीत्व असल्यामुळे पुरूषवर्गाला लगाम लावण्यात आला आहे. असे अगणित सुरक्षाकवच मिळाले आहे तरी महिलांना यांची जाणिव नाही, कारण आपणच याला कारणीभूत आहोत. डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे सौर्वभौम आहेत ते सर्वाचेच आहेत पण इथे जातीभींती असल्याने सुर्याचा उजेड दिसूनही अंधारात जगणारे शेवटी आंधळेच असतात अगदी तसेच झाले आहे.
म्हणूनच स्त्रीवाद हा वाद अग्नीसारखा घराघरात महिलांना जाळत आहे. त्या वादाचे प्रवाह निर्माण झाले.
साठोत्तरी भारतीय साहित्यामध्ये साहित्याचे जे नवे प्रवाह निर्माण झाले त्यामध्ये स्त्रीवादी साहित्य हा अत्यंत साहित्य प्रवाह महत्त्वाचा साहित्य प्रवाह मानला जातो.तो महत्त्वाचा या साठी की भारतासारख्या पुरुष प्रधान ,पितृसत्ताक, वर्ण. जाती -व्यवस्था व तदनुषंगिक सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात जगाप्रमाणेच अर्धी लोकसंख्या स्त्रीयांची असताना व जगाच्या पातळीवर ज्यांचे शोषण तितक्याच वैविध्यपूर्ण रित्या केले जाते .समाजाच्या नावाखाली, धर्म, परंपरा, पुरुष प्रधान संस्कृती च्या नावाखाली सदैव करत आले आहेत.आणि ऐवढेच नाही तर स्त्रीही तेवढीच जबाबदार राहीलीच नाही. पुरूष वर्गाला डोक्यावर घेऊन त्यांचे हवे नको ते सगळे निर्णय मानत गेल्यामुळे नव्या पिढीलाही तसेच करण्यास भाग पाडले जात असताना त्यातुन नवा कलह.निर्माण होत असताना सुध्दा
स्त्री वाद हा नेहमीच न सुटणारा गुंता बनत जात आहे.
स्त्रीवादी साहित्य हे जनजागृती चे साहित्य असल्यामुळे ही भारतासारख्या परंपराप्रिय देशात त्यांची आवश्यकता जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे .कारण या देशात स्त्री केवळ जैविक पातळीवरच शोषिल्या गेल्याचे आढळत नाही तर लैगिक, मानसिक, जातीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, भाषिक, कौटुंबिक, पातळ्यावरही शोषिल्या गेली आहे. तिला अश्या अंधारमय अंधश्रद्धेत राहताना तिला वाटत नाही की आपण बंदिस्त आहोत म्हणून कारण स्वंताला त्या मध्ये तिने बंदिस्त केले करून घेतले आहे. त्यामधून जर एखादी स्त्री बाहेर पडण्यासाठी झुंज देत असेल तर तिची ही त्यामधुन सुटका होत नाही. तरी स्वंताःच्या सक्षमतेने व जिद्दीने तिने आकाश कवेत घेतले आहे.त्या गरूड झेपचे नाव आहे संविधान…हे कोणत्याही स्त्री ने विसरू नये. पण इथे तसे नाही कारण आजची स्त्री ही संपूर्ण पुरूष प्रधान झाली आहे.
शेवटी पुरूषप्रधान संस्कृती स्त्रीयांचे शोषण करण्यासाठी आहे का हा प्रश्न अनेक शतकापासून रोजचा आहे.
धर्म, परपंरा, समाज, भाषा, संस्कृती कडुन केवळ पुरूष प्रधान व पितृसत्ताक या एकाच निकषांवर स्त्रीचे शोषण होण्यापासून अथवा होण्याला व होत राहण्याला स्त्रीवादी साहित्य निर्माण झाले.केवळ स्त्री असणे हा शोषणाचा निकष होऊ शकत नाही ,असा दावा आहे ,माणुस म्हणून जे जे हक्क, विशेषअधिकार केवळ पुरूषाला मिळतात ते ते हक्क अधिकार प्राप्त करण्यास स्त्री ही पात्र आहे असे त्यांचे मत आहे. ते सर्व प्रकारच्या विषमत्तेला विरोध करून समतेच्या प्रस्थापनेचे मागणी करणारे साहित्य आहे. म्हणून तो साहित्य प्रवाह सर्व स्त्री अनुभवांना समावून घेत जोरकसपणे गतिमान होत जाणे ही काळाची गरज आहे
प्रस्तृत मी लेखा मध्ये स्त्री वादी साहित्यांची माडंणी त्यांच्या नव्या दिशांची आव्हाने पेलण्यास समर्थ पणे आव्हानात्मक व्हावे असे मला वाटते
आव्हानात्म आयोजन करण्यासाठी प्रथम स्त्रीवादी साहित्य संकल्पना समाजून घेणे आवश्यक आहे

    स्त्रीवादी साहित्य व स्वरुप

स्त्री वादी साहित्य ही एक संयुक्त संकल्पना असुन ती स्त्री. वाद आणि, साहित्य या तीन संकल्पनेच्या एकत्रिकरणातून निर्माण करण्यात आली आहे.
हा विषय जरी साधा सोपा वाटत असेल तरी तो तितकाच किचकट आहे जगाच्या पाठीवर आज रोजचा जर संघर्ष होत असेल तर याच विषयावर होत असतो
म्हणून च स्त्रीवाद समजावून घेणे महत्वाचे वाटते.
इतर प्राण्यांप्रमाणेच माणूस हाही लिंगधारी देह घेऊन जन्माला येतो .त्यामुळे जीवधर्मानुसार इतर प्राण्या प्रमाणेच माणसांनी भिन्नलिंगी देह लाभलेला असतात, लिंग ही एक जैविक संकल्पना मानली जाते, तोच इतर प्राण्यांप्रमाणे माणसालाही विभागण्याचा नैसर्गिक आधार मानला जाते. त्या आधारावर, नर आणि मादी, अश्या दोन भिन्न मनुष्य जाती मानल्या जातात अर्थात इतर प्राणी व माणसासंदर्भात हे लिंगाधारित वर्गीकरण जैविक स्वरुपाचे असले तरी माणसाच्या बाबतीत मात्र या जैविक वर्गिकरणाला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ प्राप्त होतात परिणामतःमानवी समाजात, नर, आणि मादी, ऐवजी
पुरूष आणि स्त्री अशी विभागणी केली जाते पैकी ,स्त्री ,हा शब्द संस्कृतीतील, स्त्रोण, या पासून बनलेला असून त्याचा अर्थ स्त्रवणे, स्त्राव होणे असा होतो, स्त्राव होण्याचा जैविक गुणधर्म निसर्गाने, मादीला दिला असल्याने मानवी समाजात तिला स्त्री म्हटले गेले आहे. एवढ्यावरच न थांबता शरीर वा जैविक भेदाची गल्लत सामाजिक -सांस्कृतिक भेदाशी केली जाऊन समाज व संस्कृती च्या स्त्री विषयाच्या अपेक्षा स्त्रीवर आरोपीत करून त्यातुन स्त्रीत्व निसर्गतःनाजुक गोड, लाजरी, मर्यादाशील, विनयशील वगैरे ठरवतो, परंतु या साचाने खरे स्वरूप शरीर वा जैविक नसून तसे मानण्याची चाल समाजाला सत्ताधारी घटक म्हणजेच पुरूष खेळत असल्याने स्त्रियांचा लक्षात आले नाही. जेव्हा आले तेव्हा ते बंधन नसून एक परपंरा झाली आहे असे तिला सागंण्यात आले आणि विरोध केला तर तिला वाईट शिव्यांनी जगासमोर वाईट ठरविण्यात आले आणि हाच स्त्रीचा चक्रव्यूह निर्माण झाला.
पण महिला हा शब्द डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोधून काढला आहे. कारण हिंदू कोड बिल जर पास झाले असते तर इथे पुरुष प्रधान संस्कृती जरी असती तरी महिलांना सक्षम आजच्या पेक्षाही ती गतीमान झाली असती.
कारण
संस्कृतीचा निषेध करण्यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु कोड बिल बनविले पण ते पास झाले नाही.
आजची महिला शिक्षणाने जेवढी सक्षम झाली आहे तेवढीच ती अंधश्रद्धे मध्ये गुंतली आहे ती कधीच स्वंताःचे विचार तेवत ठेवत नाही हीच शोकांतिका आहे.
ज्याचे विचार चिरतरून तो वृद्ध होत नाही
ज्याचे विचार बुरसटलेले तो विचार बुध्द होत नाही
पारमितेशी जोडलेली नाळ सत्य सांगते .
गोमुत्र शिंपढल्याने कुणी शुध्द होत नाही
म्हणून माझ्या मैत्रीणींनो डोळे उघडा आणि पाहा जग कुठे जात आहे आपण नुसत दैववाद, देववाद आहोत हा कलंक आहे भारतावर अंधश्रद्धा आपल्या मध्ये ठासून भरलेली आहे. डाँ, इजि., शिक्षका. प्रा… असलेल्या स्त्री या आज ही तेवढ्याच गतीने अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहे.

    सुनीता इंगळे
    मूर्तिजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *