• Tue. Jun 6th, 2023

शेतकरी जगेल तर देश जगेल


आज देशात शेती करायला कोणी पाहात नाही.लोकं शेत्या विकत आहेत.कारण शेती पीकत नाही.आत्महत्येचं सत्र सुरु आहे.सरकारी मदत पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यानं शेतक-याचं अतोनात नुकसान होत आहे.त्याचबरोबर देशात कोरोनाचं सत्र सुरु आहे.सर्वत्र भीतीचं वातावरण आहे.लाकडाऊनचा असर अजूनही देशात आहे.कामधंदे सुरु झाले आहेत.पण अजूनही ब-याच लोकांना कामं मिळालेली नाहीत.काही लोकं अजूनही खाली आहेत.
देशातील बराचसा भाग हा शेतीवर अवलंबून आहे.लोकांनी आपल्या शेतात शेतमालाची पेरणी केली.शेतात पीकं चांगलीही होती.मात्र जेव्हा सोयाबीन फुलावर आलं.तेव्हा मात्र पाऊस सुरु झाला.तो पाऊस टिपीर टिपीर सुरु झाला.त्यामुळं पीकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली.अर्थात त्या पावसानं पीक कोमेजण्यास मदत झाली.
पीकांच्या वाढीला लागणारा सुर्यप्रकाश.या काळात सुर्य निघालाच नाही.त्यामुळं या सुर्यप्रकाशानं वनस्पतीच्या पानात जी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते.त्यातून वनस्पती अन्न निर्माण करतात.ते वनस्पतींना करता न आल्यानं वनस्पतींना पुरेसं अन्न मिळालं नाही.महत्वाचं म्हणजे यातून रोपांची पानं पिवळी पडली.त्यातच अख्खं झाड करपलं.तसंच काहींची फुलं करपली.काहींना शेंगा लागल्या.पण त्याही पोचट.त्यामुळं काही भागात ही सोयाबीन कापता येणं शक्य नाही.अशी स्थिती एकंदर ब-याच लांबपर्यंत दिसत आहे.त्यावरुन असं वाटत आहे की शेतक-यांच्या शेतात यावर्षी कोरोना तर शिरला नाही.
एकीकडे हा कोरोना घरी राहिल्यास लोकांना उपासानं मारत आहे.दुसरीकडे हा कोरोना कामावर गेल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव होवून आजारानं मारत आहे.अशावेळी काय करावे लोकांना सुचत नाही.अशातच सरकारपुढेही पेच निर्माण झाला आहे.या कोरोनासारख्या आजारावर मात कशी करावी? हा प्रश्न सरकारपुढे उभा आहे.लाकडाऊन लावलं तरी लोकं मरतात.नाही लावलं तरी लोकं मरतात.त्यामुळं सरकारलाही सुचेनासे झाले आहे.त्यातच आता शेतक-यांच्या पीकांचं नुकसान.कदाचित हे होत असलेले नुकसान कदाचित कोरोनाचं तर लक्षण नाही.कदाचित कोरोनानं पीकांना तर छळलं नसावं असं वाटायला लागलं आहे.
शेतकरी आत्महत्या………अशाच शेतकरी आत्महत्या होत असतात.शेती करण्यासाठी बियाणे खते घेण्यापासून तर पुढं पीक हातात येईपर्यंत सतत शेतक-याला पैसा लावावा लागतो.नांगरणी करणे,बीयाणे घेणे,ती पेरणे,त्यानंतर खते टाकणे,निंदण करणे,डवरा मारणे,पाणी देणे, किडनाशक तणनाशक मारणे,कापणे,मळणी यंत्राने धान्याचे विलगीकरण करणे,ते बाजारपेठेत नेणे इत्यादी सर्व कामे शेतकरी आपल्या शेतात करतात.या सर्वच गोष्टीला पैसा लागतो.मग आशा असते की धान्य विकल्यावर हा पैसा निघेल.पण असा पैसा जर निघत नसेल तर शेतकरी जगणार कसा?कर्जही काढेल.पण ते कर्ज केव्हापर्यंत मिळेल.कोण केव्हापर्यत कर्ज देईल.सततचा दुष्काळ जर पाचवीलाच लागला असेल शेतक-यांच्या तर शेतकरी कसा जगेल? हाही प्रश्न आहे.
शेतकरी जगला पाहिजे.शेतकरी जगेल तर देश जगेल.पण जिथे अख्खा देश कोरोनाच्या संकटात असतांना व पीकांचीही अशा स्वरुपाची अवस्था असतांना देश तरी कोणते पाऊल उचलणार हा न उलगडणारा प्रश्न आहे.देशालाही वाटते शेतकरी जगावा.पण अशा शेतक-यांची संख्ख्या बोटावर मोजण्याएवढी असते का? याचं उत्तर नाही असंच आहे.
महत्वाचं म्हणजे सरकारला जरी वाटत असेल की शेतकरी जगला पाहिजे तर सरकारनं एक काम कमी करावं आणि ज्या भागात असं नुकसान झालं,त्या भागातील लोकांना सरकारनं नुकसान भरपाई द्यावी.कारण शेतकरी जगेल तर देश जगेल.जर अशी नुकसान भरपाई शेतक-याला मिळाली नाही तर असे शेतकरी आत्महत्येने मरतील.मग शेती करायला कोणी वाली उरणार नाही.शेती होणार नाही.धान्य पीकणार नाही.कोणी पीकवणार नाही.मग जिथे शेतीच पीकणार नाही.तिथे पोटाला अन्न तरी कोठून मिळणार.तेव्हा ही परिस्थिती येवू नये.म्हणून त्याला जगविण्यासाठी सर्व समाजातील घटकांनी मदत करावी.जेणेकरुन शेतकरी जगेल तर देश जगेल असं म्हणता येवू शकेल.

अंकुश शिंगाडे

नागपूर ९३७३३५९४५०

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *