शिक्षा बंदीच्या मृत्यूविषयी माहिती देण्याचे आवाहन

अमरावती: अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा बंदीच्या मृत्यूच्या घटनाविषयी माहितगार व्यक्तींनी माहिती देण्याचे आवाहन चौकशी अधिकारी तथा अमरावतीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शिक्षाबंदी क्र. सी. 4587/20, ओमप्रकाश भारत भटकर (वय 31, रा. भागीरथवाडी, वाशीम बायपास, अकोला) यांचा दि. 13 जुलै 2020 रोजी पहाटे 3 वाजता अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला.

या चौकशीत कैदी मयत होण्याचे कारण काय, कैदीचे मृत्यूपूर्व स्वास्थ्य कसे होते, कैदीला मारामारी होऊन मृत्यू झाले किंवा कसे, पोलीसांनी कोणती भूमिका बजावली, वैद्यकीय उपचाराचे कागदपत्र व व्हिसेरा अहवाल आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. ज्यांना या घटनांसंबंधी माहिती द्यावयाची आहे, त्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात (तहसील कार्यालय परिसर, श्याम चौक, अमरावती) 20 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.