वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ६४ कोटी ६४ लक्ष ८२ हजार ४०० रुपये मदत !

वरुड: वरुड मोर्शी तालुक्यामध्ये सप्टेंबर, डिसेंबर २०१९ ,जानेवारी २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते गारपिटीमुळे संत्रा शेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता तेव्हा आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला .
आमदार देवेंद्र भुयार यांनी डिसेंबर २०१९ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, मुळे झालेल्या शेती पिकांचे फळ बागांच्या झालेल्या नुकसानीची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत आढावा बैठक घेऊन वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या या मागणीकडे विशेष लक्ष घालून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची गळ घातली असता मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना तात्काळ कार्यवाही बाबतचे आदेश देण्यात आले. त्यानुसार वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये वरुड तालुक्यासाठी ३० कोटी २९ लक्ष ५८ हजार २०० रुपये व मोर्शी तालुक्यासाठी ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये असे एकूण ६४ कोटी ६४ लक्ष ८२ हजार ४०० रुपये इतकी नुकसान भरपाई मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ६४ कोटी ६४ लक्ष ८२ हजार ४०९ रुपयांची मदत उपलब्ध करून शेतकऱ्यांना आधार दिला आहे . आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत फक्त ९ महिन्यामध्ये उपलब्ध करून दिली यामध्ये वरुड तालुक्यातील कापूस तूर पिकाचे १६१४८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले झाले असून हरभरा पिकाचे २३३५ हेक्टर क्षेत्र, संत्रा पिकाचे ९०१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते त्याकरीता कापूस तूर पिकाला हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, हरभरा पिकाला १३ हजार ५०० रुपये, संत्रा पिकाला १८ हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली आहे. मोर्शी तालुक्यातील ३७९६० शेतकऱ्यांचे ४०५४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये मदत आमदार देवेंद्र भुयार यांच्या अथक परिश्रमामुळे प्राप्त झाले असून मोर्शी तालुक्याला आवश्यक असलेली संपूर्ण रक्कम उपलब्ध करून दिली त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर तसेच मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर तसेच महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिकारी वर्गाचे आभार आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले . नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनी आपले नुकसान भरपाई रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा झाली किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे.
मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मागील सरकारच्या काळामध्ये भीषण दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यामध्ये मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले भीषण दुष्काळात लाखो संत्रा झाडे वाळली, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. मागील सरकार हे शेतकऱ्यांचे हिताचे नव्हते त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिला उद्योगपती तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी अवस्था मागील सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांची झाली होती मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्याचे असून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारं असून यावर्षी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची वरुड तालुक्याला ३० कोटी २९ लक्ष ५८ हजार २०० रुपये तसेच मोर्शी तालुक्याला ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये, एकूण ६४ कोटी ६४ लक्ष ८२ हजार ४०० रुपये मदत ९ महिन्यामध्ये मिळवून दिल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!