• Sat. Jun 3rd, 2023

राष्ट्रपती भवनातील गार्ड बटालियन बदलाच्या सोहळ्याचे राष्ट्रपतीकडून अवलोकन

ByBlog

Nov 28, 2020

मुंबई(पीआयबी) : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित भारतीय लष्कराच्या गार्ड बटालियन बदलाच्या सोहळ्याचे अवलोकन केले. यामधील पहिल्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनने सेरेमोनियल आर्मी गार्ड बटालियन म्हणून साडेतीन वर्षांचा कार्यकाळ तो शीख रेजिमेंटच्या सहाव्या बटालियनकडे हा कार्यभार सोपविला.
राष्ट्रपती भवनातील सोहळ्याचे आर्मी गार्ड म्हणून लष्करातील विविध पलटणी आळीपाळीने रुजू होतात. राष्ट्रपती भवनात समारंभातील सैनिक म्हणून कर्तव्य बजावणारे पायदळातील हे सैनिक मान्यवरांना सलामी देणारे सैनिक, प्रजासत्ताक दिन संचलन, स्वातंत्र्य दिन संचलन, बीटिंग रिट्रीट सोहळा यासारख्या महत्त्वाच्या सोहळ्यातही गार्ड ऑफ ऑनर म्हणून सहभागी होतात.
पहिल्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या पलटणीचे लष्करी अधिकारी आणि सहाव्या शीख पायदळाचे लष्करी अधिकारी नंतर राष्ट्रपतींना भेटतील. कर्तव्य बजावलेल्या पहिल्या गोरखा रायफलच्या पाचव्या पलटणीशी राष्ट्रपती संवाद साधतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *