‘महाऊर्जा’तर्फे ऊर्जा व्यवस्थापन पारितोषिकासाठी अर्जाचे आवाहन
अमरावती : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत (महाऊर्जा) ऊर्जा कार्यक्षमता, व्यवस्थापन व ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय काम करणा-या घटकांना राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पारितोषिक देण्यात येते. सहकारी संस्था, शिक्षण संस्था, महापालिका, स्वयंसेवी संस्था, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, खासगी उद्योग आदी घटकांकडून या पारितोषिकासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या उपक्रमात सहभागासाठी संपूर्ण माहितीwww.mahaurja.comयेथे उपलब्ध आहे. ऊर्जा क्षेत्रात भरीव काम करणा-या घटकांनी 10 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा. त्याचप्रमाणे, अधिक माहितीसाठीeee@mahaurja.comकिंवाdgamravati@mahaurja.comया ई-मेल संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.