• Wed. Jun 7th, 2023

बेस्ट प्राइज भाग्यविजेता उमेदवारांची घोषणा गोविंद तट्टे यांना पल्सर तर मोहित रोणे यांना रोख रक्कम

ByBlog

Nov 11, 2020

अमरावती : सणासुदीच्या म्हणजेच दसरा आणि दिवाळी दरम्यान अमरावती शहरातील फ्लिपकार्ट बेस्ट प्राइज येथून खरेदी करणार्‍या किरकोळ विक्रेते आणि लघु उद्योजक यांच्यातील भाग्यविजेता उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात बेस्ट प्राइज़ चे नियमित ग्राहक असलेले गोविंद श्रीधर तट्टे यांना बजाज पल्सर दुचाकी तर जय भोले मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मोहित रोणे यांना नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.

दुचाकी विजेते गोविंद तट्टे यांनी याबाबत बोलताना सांगितले की “उत्सवांच्या काळात ब्रँड्सतर्फे अशा मोहिमा सुरू करणे यासारखी चांगली बाब कोणती असेल! मला ही आजवर मिळालेली सगळ्यात उत्कृष्ट भेट आहे. मी बाइक जिंकलोय यावर माझा विश्वासच बसत नाही,” तर रोख रककम जिंकणारे मोहित रोणे यांनी सांगितले की “यंदाच्या दिवाळीत माझ्यासोबत घडलेली ही सगळ्यात छान गोष्ट आहे,” हे म्हणताना मोहित यांनी आभार व्यक्त केले. तसेच दिवाळी दरम्यान बेस्ट प्राइजमध्ये सवलती, खास सूट, रोख रककम, अशा अनेकविध बाबींमधून किरकोळ विक्रेत्यांना खरेदी करण्याची व्यापक संधी दिली असून यात भाग्यविजेता एक नशिबवान विजेत्याला मर्सिडीज कार मिळणार आहे तर तब्बल 29 विजेत्यांना बजाज पल्सर 125cc बाइक मिळणार आहे. बेस्ट प्राइसमुळे छोट्या किराणा दुकानदारांना उत्तम किमतीला माल विकता येतो तसेच मर्चंडायझिंग, प्रोडक्ट प्लेसमेंट आणि बाजारपेठेची माहिती अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर इतरांकडूनही माहिती मिळवता येते. या उत्सव काळातील मोहिमेमुळे छोट्या रीटेलर्सना त्यांच्या गिफ्टिंग आवश्यकता पूर्ण करणे आणि आकर्षक बक्षिसे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्व विजेत्यांमध्ये असलेला एक समान धागा म्हणजे हे सगळे फ्लिपकार्टच्या बी2बी व्यवसायाचे सदस्य आहेत आणि आपल्या दुकानातील उत्सव काळातील मालासाठी खरेदी करणारे हे सगळे छोटे रीटेलर्स आहेत. यंदा बेस्ट प्राइजने दिवाळी बोनान्झाचा कालावधी मागील वर्षीच्या 10 दिवसांऐवजी 20 दिवसांपर्यंत वाढवला आहे. मागील वर्षी फक्त वॉक-इन स्टोअरपुरता मर्यादित असलेला हा बोनान्झा आता ई-कॉमर्ससाठी उपलब्ध आहे. बेस्ट प्राइज़ने फॅशन विभागात 16 शहरांमध्ये या उत्सवाच्या काळात आकर्षक सवलतीही देऊ केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *